पार्थ पवार यांच्या प्रचाराची खिंड धाकटा भाऊ लढवणार!
आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडला, वडील अजित पवारांकडून बैठकांच सत्रच सुरु आहे. आई सुनेत्रा पवार या देखील छोटेखानी सभा-बैठका पार पाडत आहेत तर गेल्या दोन दिवसंपासून चुलत बंधू रोहित पवारही काकांच्या सूचनेनंतर प्रचारात सक्रिय झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यापासून पवार कुटुंबीय मावळ लोकसभेतच वावरताना दिसत आहेत. आजोबा, वडील, आई आणि चुलत भाऊ हे मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
पण सोशल मीडियात गुंतलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आता सख्खा भाऊ 'जय' देखील प्रचाराची खिंड लढवणार आहेत.
सध्या ते सोशल मीडियावरील प्रचाराची रणनीती आखत आहेत. लवकरच ते प्रचारात सक्रिय झालेले पाहायला मिळतील.
पार्थ पवार यांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पीढी राजकारणात येत आहे. शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी माढ्यातून माघार घेतल्याचं सांगितलं. यानंतर पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
आता ही मंडळी जाहीर सभा, बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील. पण जी मंडळी खासकरुन तरुणवर्ग जो सभा आणि बैठकांपासून कोसो दूर राहून सोशल मीडियात गुंतलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आता 'जय अजित पवार' खिंड लढवणार आहेत.
मोठे बंधू पार्थ यांना वि'जय' मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर सोशल मीडियाची जबाबदारी जय पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -