Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्री श्रींपासून रहमानपर्यंत, जलीकट्टूसाठी सर्वजण मैदानात
समर्थकांच्या यादीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांचाही नंबर लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्राणीप्रेमींचा आरोप - बैलांना चिडवण्यासाठी त्यांना मद्य पाजून, मारहाण करुन उसकावलं जातं असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे. फक्त स्पेनमधल्या बुल फाईटप्रमाणे इथे बैलाला जीवे मारलं जात नाही. बैलगाडी शर्यतींमध्येही अशा पद्धतीने बैलांना मारहाण होत असल्याचा आरोप आहे.
विख्यात बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनेही जलिकट्टूला पाठिंबा दिला आहे.
याशिवाय आर अश्विनही जलीकट्टूच्या बाजूने उभा आहे.
जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीकं कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो. यामध्ये 300-400 किलोच्या बैल/सांड यांच्या शिंगांना नोटा बांधल्या जातात. त्यानंतर बैलाला भुजवून चिडवलं जातं आणि गर्दीत सोडून देतात. या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगं पकडून त्याला शांत करायचं असतं.
त्यासाठी आज तामिळनाडू बंदची हाक देण्यात आली आहे.
जलिकट्टू बंदीविरोधात आज संपूर्ण तामिळनाडू एकवटलं आहे. जलिकट्टू या पारंपारिक खेळाला परवानगी मिळावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी आवाज उठवला आहे.
संगीतकार ए आर रहमानने या खेळाला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी रहमान एक दिवसाचं उपोषण करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -