Exclusive : इटलीतील लेक कोमोमध्ये रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणवीरने दीपिकासमोर आपलं प्रेम याच ठिकाणी व्यक्त केलं होतं. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी हे ठिकाण निवडलं, असं सांगितलं जात आहे.
इटलीचा लेक कोमो जगभारातील लोकांना लग्नासाठी आवडीचं ठिकाण बनलं आहे. लेक कोमोच्या सभोवताली बर्फाळ डोंगर रांगा आहेत. त्यामुळे याठिकाणचं सौंदर्य जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे
त्यानंतर रणवीर सिंहकडून सिंधी पद्धतीने 15 नोव्हेंबरला पुन्हा लग्न होईल. हॉलिवूडचा सिनेमाचा 'स्टार वॉर्स : एपिसोड 2'चं याठिकाणी शूटिंग झालं होतं.
दीपिका-रणवीरचं लग्न होणार आहे, त्याठिकाणी जेम्स बॉन्डच्या कसिनो रोयाल सिनेमाचं शूटिंग झालं होतं. दाक्षिणात्य पद्धतीने याठिकाणी दोघांचं लग्न होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर सी प्लेनने याठिकाणी येणार आहे.
ज्या व्हिलामध्ये दोघांचं लग्न होणार आहे, ते एक हेरिटेज व्हिला आहे. या व्हिलामध्ये राहण्याची परवानगी नाही. व्हिला रणवीर-दीपिकाच्या लग्नासाठी भाड्यानं घेतल्याचं बोललं जात आहे.
रणवीर-दीपिकाचा विवाह ज्याठिकाणी होणार आहे तेथे एबीपी न्यूजची टीम पोहोचली आहे. इटलीचा लेक कोमो दोघांच्या लग्नाचा साक्षीदार बनणार आहे.
इटलीतील लेक कोमोमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रणवीर-दीपिकाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर बंगळुरुत 23 नोव्हेंबरला भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.
विवाह सोहळ्यासाठी रणवीर आणि दीपिका रविवारी इटलीला रवाना झाले आहेत.
बॉलिवूडचं हॉट कपल अर्थात अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची 'लग्नघटिका समीप' आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -