इस्रोची जबरदस्त कामगिरी, GSLV MK-3चं यशस्वी प्रक्षेपण
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 08:01 PM (IST)
1
स्वदेशी लीथियम आयन बॅटरींद्वारे चालणार
2
इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्यास मदत होईल
3
भारतात बनवलेलं आणि प्रक्षेपण करण्यात आलेलं सर्वात वजनदार उपग्रह
4
यामुळे भारतासमोर अंतराळ संशोधनाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
5
जीएसएलव्ही मार्क-3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताला चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं शक्य होणार आहे.
6
याआधी 2 हजार 300 किलोहून अधिक वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी इस्त्रोला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं.
7
जीएसएलव्ही मार्क-3 संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं.
8
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आणखी एक मोठा इतिहास रचला आहे. इस्त्रोनं श्रीहरीकोटातून सर्वात वजनदार जीएसएलव्ही मार्क-3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे.