टीम इंडियाच्या आणखी एका शिलेदाराची विकेट, लवकरच बोहल्यावर!
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2016 10:06 AM (IST)
1
इशांतनं टीम इंडियासाठी 68 कसोटीमध्ये 201 बळी मिळवले आहेत. तर 80 वनडेमध्ये 115 बळी घेतले आहेत.
2
इशांतला त्याच्या टीमसह रोहित शर्मानं खास शुभेच्छा दिल्या. आमच्या ग्रुपमध्ये तुझं स्वागत, पण किमान आजच्या दिवशी तरी केस कापायचे ना भावा!
3
इशांत शर्मा आयपीएलच्या या हंगामात पुण्याच्या संघाकडून खेळला. या हंगामात त्याने 4 सामन्यात 3 गडी बाद केले.
4
ही बातमी इशांत शर्माच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन समोर आली.
5
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची बॉस्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंह हिने विकेट काढली आहे. प्रतिमा आणि इंशात यांचा काल दुपारी साखरपुडा पार पडला.
6
टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजाला बास्केटबॉल स्टारनं क्लीन बोल्ड केलं आहे.
7
टीम इंडियाचा आणखी एक स्टार खेळाडू लवकरच आपल्या जोडीदाराबरोबर लग्न बंधनात अडकणार आहे.