वनडे, टी-20 क्रिकेटमध्ये मी फार प्रभावी नाही: इशांत शर्मा

सध्या इशांत संघातील नव्या खेळाडूंसोबत आपला अनुभव शेअर करतो. जेणेकरुन त्याच्या त्यांना देखील फायदा होईल असं त्याला वाटतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इशांत शर्मानं आजवर 68 कसोटी सामन्यात 201 बळी मिळवले आहेत.

'प्रत्येक खेळाडू हा वेगळवेगळ्या पद्धतीनं घडत असतो. जसं भुवनेश्वर कुमार चांगला स्विंग करु शकतो. पण माझ्याप्रमाणे बाऊन्सर टाकणं त्याला जमू शकत नाही. तसंच मी भुवीसारखा चेंडू स्विंग करु शकत नाही.' असंही इशांत म्हणाला.
इशांतनं दोन दिवसीय प्रॅक्टिस मॅचनंतर बीसीसीआय टीव्हीला सांगितलं की, तुम्ही स्वत: प्रामाणिक असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला सत्य स्वीकारणं सोपं जातं. मी मान्य करतो की, मी वनडे किंवा टी20 क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन नाही करु शकलो. पण मी टेस्ट क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करीत आहे. माझी शक्तीस्थानं मला माहित आहेत. आपली शक्तीस्थळं समजणं हे फार महत्वाचं आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं मान्य केलं आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे आपली गोलंदाजी प्रभावी ठरते त्याप्रमाणे वनडे किंवा टी-20 मध्ये होत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -