IPL : वानखेडेवर पिवळं वादळ, फायनलसाठी तुफान गर्दी
या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या वानखेडेवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.
या सामन्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. वानखेडेवर सगळीकडे पिवळे झेंडे दिसत आहेत.
चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंची बस जेव्हा वानखेडे मैदानात दाखल झाली, तेव्हा चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
चेन्नईच्या त्याच फौजेने मग वानखेडे स्टेडियमच्याच साक्षीने फायनलमध्ये धडक मारली. आता आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरायचं तर चेन्नईसमोर आव्हान आहे ते सनरायझर्स हैदराबादचं.
याच वानखेडे स्टेडियममधून सात एप्रिलला आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा रथ निघाला होता. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सला हरवून नव्या मोसमाची विजयी सलामी दिली होती.
दोन्हीही संघाचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, मात्र चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार धोनीच्या चाहत्यांनी पिवळ्या जर्सीसह गर्दी केली आहे.