IPL 2018 : गंभीर, रोहित आणि कोहली रैनाला मात देणार?
दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने आतापर्यंत 149 सामन्यातील 141 इनिंगमध्ये 4 हजार 418 धावा काढल्या आहेत. नव्या मोसमात विराट आणि सुरेश रैनामध्ये या विक्रमासाठी स्पर्धा असेल. विराटच्या या धावांमध्ये 4 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या आयपीएलची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे धावांचं युद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. भारताचे चार दिग्गज फलंदाज एकमेकांचा विक्रम तोडण्यासाठी यावेळी प्रयत्न करतील.
दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार चेन्नई सुपरकिंगच्या या तडाखेबाज फलंदाजाला आव्हान देऊ शकतील का, असा प्रश्न आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंगच्या सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 10 मोसमात खेळलेल्या 157 इनिंगमध्ये 4 हजार 540 धावा केल्या आहेत. 139 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा काढल्या. या विक्रमी धावांमध्ये एक शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.
कोहली आणि रैनानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने 159 सामन्यातील 154 इनिंगमध्ये 4 हजार 207 धावा काढल्या आहेत, ज्यामध्ये 1 शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
या यादीत चौथ्या क्रमांकावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 148 सामन्यांच्या 147 इनिंगमध्ये 4 हजार 132 धावा काढल्या आहेत. अजूनही तो आयपीएलमधील पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याने आतापर्यंत विक्रमी 35 अर्धशतकं ठोकले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -