आयफोन 8 च्या लाँचिंगपूर्वी इतर आयफोन्सवर भरघोस सूट!
आयफोन SE : या फोनवर जवळपास 50 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. 39 हजार रुपये किंमताचा हा फोन 20 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयफोन 7 प्लस : या फोनचं 32GB व्हेरिएंट (गोल्ड मॉडल), ज्याची किंमत 72 हजार रुपये होती. हा फोन आता डिस्काऊंटनंतर 51 हजार 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 प्लसचं 128GB व्हर्जन डिस्काऊंटनंतर 57 हजार 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 82 हजार रुपये होती. त्यामुळे आयफोन 7 प्लस 32GB व्हेरिएंटवर जवळपास 20 हजार रुपये आणि 128GB व्हेरिएंटवर 24 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
आयफोन 7 : 65 हजार 200 रुपये किंमत असलेला आयफोन 7 आता 47 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर आयफोन 7 चं 32GB व्हेरिएंट, ज्याची किंमत 56 हजार 200 रुपये होती, तो फोन आता 39 हजार 599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 256GB स्टोरेज व्हेरिएंट डिस्काऊंटनंतर 62 हजार 99 रुपयात मिळत आहे. आयफोन 7 32GB व्हेरिएंट (सिल्व्हर मॉडल) डिस्काऊंटनंतर 40 हजार 799 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
आयफोन 6S : 62 हजार रुपये किंमतीचा हा फोन डिस्काऊंटनंतर 55 हजार 300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय फोन मानला जातो.
अॅपल लवकरच आयफोन 8 लाँच करणार आहे. या फोनच्या लाँचिंगची कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अमेरिकेत हा फोन 12 सप्टेंबर रोजी लाँच होईल, अशी माहिती आहे. आयफोन 8 लाँच होण्यापूर्वी कंपनीच्या इतर प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट मिळणार आहे. पेटीएम मॉलवर आयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन 6s आणि आयफोन SE सहित प्रीमियम स्मार्टफोन्सवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -