अॅपल प्रेमींची प्रतीक्षा संपली; आयफोन, अॅपल वॉच 4सह इतर डिव्हाईसही लाँच
अॅपल वॉचची किंमत 399 डॉलर (28 हजार 700) आणि 499 डॉलर (35 हजार 900) अशी असेल.
अॅपल वॉच 4 ची स्क्रीन या अगोदरच्या वॉचपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. तर डिझाईन आणि यूजर इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहेत.
नव्या आयफोनची कॅमेरा क्वालिटी खास असणार आहे. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 5.8 इंच आणि 6.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे.
अॅपलने लाँच केलेल्या दोन्ही फोनमध्ये हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. तर इंटर्नल स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
आयफोन Xs मध्ये देण्यात आलेल्या 6 कोअर प्रोसेसरमुळे हा फोन 30 टक्के वेगवान असेल, असा दावा कंपनीने केला आहे.
आयफोन Xs चं मोठं व्हेरिएंट आयफोन Xs मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
एअरटेल आणि रिलायन्स जिओ नव्या Xs आणि Xs मॅक्समध्ये ई-सिमची सुविधा देणार आहेत.
अॅपलने यावर्षी आयफोन Xs आणि Xs मॅक्स लाँच केला आहे. या फोनमध्ये ड्ययुअर सिम सपोर्ट असणार आहे. तर ई-सिम नव्या आयफोनसोबत असणार आहेत.
अॅपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये आयफोनसह अॅपल वॉच 4 आणि इतर डिव्हाईसही लाँच केले.