इंटेक्सचा 5 हजारांपेक्षाही कमी किंमतीचा 4G स्मार्टफोन लाँच
हा फोन विक्रीसाठी सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची किंमत केवळ 3 हजार 999 रुपये आहे. ( सर्व फोटो सौजन्यः intex.in)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंटेक्स ग्लोरी 4G असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या फोनच्या नावातच 4G असल्यामुळे हा फोन 4G असणारचं आहे, शिवाय यामध्ये 6.0 मार्शमेलो सिस्टीम आहे.
इंटेक्स कंपनीने आपला पाच हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत असणारा 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे फिचर्स देखील जबरदस्त आहेत. या फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम असून फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
इंटेक्स ग्लोरी 4G या फोनमध्ये मल्टीफंक्शन आणि एलईडी फ्लॅश असणारा 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. याशिवाय 1800mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, 3.5mm जॅक, यूएसबी पोर्टल असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -