इस्रायलमध्ये मोदींचा मुक्काम असलेल्या हॉटेलच्या रंजक गोष्टी
किंग डेव्हिड हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या परिसरात अत्यंत कडेकोट सुरक्षा असते. यामागेही मोठं कारण आहे. 1946 साली हॉटेलमधील ब्रिटीश अधिकाऱ्यांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे या घटनेनंतर हॉटेलच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडण्यात आली नाही.
किंग डेव्हिड हॉटेल अत्यंत महागडं आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी तब्बल 1 कोटी 7 लाख रुपये मोजावे लागतात. शिवाय, अतिरिक्त गोष्टींसाठी आणखी वेगळे पैसे द्यावे लागतात.
किंग डेव्हिड हॉटेलच्या खिडकीच्या काचा बुलेटप्रूफ आणि रॉकेटप्रूफ आहेत, हॉटेलचा बाह्यभाग काँक्रिट आणि स्टीलने बनवण्यात आले आहे, तर एसी गॅसप्रूफ आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंग डेव्हिड हॉटेलमध्ये राहायला येणार म्हणून हॉटेलचे सर्वच्या सर्व रुम रिकामे करण्यात आले. कुणालाही राहण्यास दिले गेले नाहीत. या हॉटेलमध्ये एकूण 110 रुम आहेत.
तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलमध्ये आले होते, त्यावेळी तेही याच हॉटेलमध्ये थांबले होते. शिवाय, ज्या रुममध्ये मोदी राहत आहेत, त्याच रुममध्ये ट्रम्प यांचाही मुक्काम होता.
इस्रायल दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेरुसलेममधील अलिशान 'किंग डेव्हिड हॉटेल'मध्ये मुक्कामी आहेत. अत्यंत सुरक्षित आणि अलिशान असं हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या परिसरात कायमच कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते.