Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाना-फुलांतून समुद्राची सफर, मुंबईत अनोखं उद्यान प्रदर्शन
200 प्रकारच्या विविध फुलांच्या प्रजाती येथे पाहायला मिळणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात एक आगळी-वेगळी कल्पना घेऊन प्रदर्शन भरवले आहे.
महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात हे प्रदर्शन 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे.
स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, डॉल्फिन यांसारखे जलचर प्राणी बघायचे असल्यास आपल्याला मत्स्यालयातच जावे लागते. मात्र आता याच जलचरांना जवळून अनुभवण्याची संधी महापालिकेने उद्यान प्रदर्शनाच्या निमित्ताने दिली आहे.
यंदाच्या उद्यान प्रदर्शनात या जलचर प्राण्यांच्या प्रतिकृती पाना-फुलांपासून तयार करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या प्रतिकृती ठेवण्यासाठी सुमारे 100 मीटर लांबीची एक कृत्रिम नदी तयार करण्यात आली आहे.
या वेळची संकल्पना 'नदी बचाव, सृष्टी बचाव' आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -