जवानांच्या घरांवरील भ्याड हल्ल्याची विदारक दृश्यं
दरम्यान चकमक संपल्यानंतर साऱ्या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
याच चकमकीमध्ये साऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पण या चकमकीत एका अधिकाऱ्यासह दोन जवान धारातीर्थी पडले.
अखेर या कुटुंबीयांची सुटका करण्यासाठी भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांवर जोरदार गोळीबार केला.
या दोन्ही महिलांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं, तर शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी लष्करी निवासात असलेल्या जवानांच्या कुटुंबियांना लक्ष्य केलं असतं किंवा त्यांना ओलीस ठेवलं असतं.
त्यामुळे दहशतवाद्यांना निवासस्थानात प्रवेश करता आला नाही आणि त्यांनी बाहेरुनच बेछूट गोळीबार सुरु केला.
मात्र, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन याच निवासस्थानात राहणाऱ्या दोन महिलांनी निवाससथानाचं प्रवेशद्वार बंद केलं. इतकंच नाही तर दाराजवळ जड वस्तू लावून ठेवल्या.
सैनिकांच्या तळावर हल्ला केल्यानंतर लागून असलेल्या लष्करी निवासामध्ये दहशतवाद्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.
काही दहशतवाद्यांनी जवानांच्या घरावर बेछूट गोळीबार केला.
: जम्मूतील नगरोटा इथे झालेला हल्ला किती भ्याड होता, याची विदारक दृश्यं समोर आली आहेत.