ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यजुवेंद्र चहलने इतिहास रचला!
यजुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियातील उत्कृष्ट गोलंदाजीच्या बाबतीत भारताच्याच जलदगती गोलंदाज अजित आगरकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आगरकरने मेलबर्नमध्येच 2004 मध्ये 42 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स घेतल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचहलने 42 धावांमध्ये 6 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरोधात ऑस्ट्रेलियातच वनडेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा फिरकीपटू ठरला आहे. त्याने रवी शास्त्री यांचा विक्रम मोडला. शास्त्रींनी 1991 मध्ये पर्थमध्ये 15 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात फिरकीपटू यजुवेंद्र चहलचा समावेश करण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय योग्य ठरला. या सामन्यात यजुवेंद्र चहलने इतिहास रचला. वनडे मालिकेत आपला पहिला सामना खेळणाऱ्या चहलने 42 धावा देत सहा विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलिया संघांचं कंबरडंच मोडलं.
एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फिरकीपटूंमध्येही यजुवेंद्र चहलचा समावेश झाला आहे. याआधी शाहिद आफ्रिदी (7/12), राशिद खान (7/18), इम्रान ताहिर (7/45), अनिल कुंबळे (6/12), इम्रान ताहिर (6/24), यासिर शाह (6/26), शाहिद आफ्रिदी ( 6/38) यांनी अशी कामगिरी केली होती. आता त्यात यजुवेंद्र चहल (6/42) चा समावेश झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये एकाच वनडे सामन्यात सहा विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू बनला आहे. याआधी 18 जानेवारी 2015 रोजी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच भारताविरोधात एकाच सामन्यात सहा विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनला होता. त्याने 61 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स मिळवल्या होता. यानंतर बरोबर चार वर्षांनी म्हणजेच आज 18 जानेवारी 2019 रोजी चहलनेही त्याच मैदानावर हा पराक्रम केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -