स्वदेशी बनावटीच्या मेट्रो गाड्यांचे येत्या आठवड्यात आगमन, एकनाथ शिंदेंची बीएचईएलच्या कारखान्याला भेट
पुढील पाच वर्षांत मंबई महानगर क्षेत्रात जवळपास ३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारण्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीईएमएल येथे तयार होत असलेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी 10 कोटी रुपये खर्च येतो.
मुंबईतील मेट्रोसाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मेट्रो गाड्यांचे आगमन येत्या आठवड्यात होत असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बंगरुळू येथे बीएचईएलच्या (भेल) कारखान्याला भेट देऊन या डब्यांची पाहणी केली व तिची वैशिष्ट्ये जाणून घेतली.
एकूण 576 कोचेस टप्प्याटप्प्यानं मुंबईत दाखल होणार आहेत. नव्या मेट्रो ट्रेन्ससाठी साडेचार हजार कोटींचं क्रॉन्ट्रॅक्ट बीईएमएल कंपनीला देण्यात आले आहे. भारतातच कोचची निर्मीती होत असल्यानं प्रत्येक कोच पाठीमागे 2 कोटी रुपये वाचणार आहेत.
मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए साठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरु होणार आहे. ट्रायल रनसाठी लवकरच बंगळुरुहून मेट्रो ट्रेन्स मुंबईत दाखल होणार आहेत. पहिला कोच येत्या 23 तारखेला मुंबईकडे रवाना होईल आणि 27 तारखेला पोहोचेल.
प्रवासी ये-जा करताना घसरून पडू नये यासाठी या डब्यांचा अंतर्गत पृष्ठभाग हा अँटी स्किडींग करण्यात आला आहे.
येत्या मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहे. ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार असून सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -