मराठमोळा पैलवान राहुल आवारेचा साखरपुडा, वस्ताद काका पवारांच्या मुलीशी लवकरच विवाह बंधनात
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2019 08:02 AM (IST)
1
2011 आणि 2019 च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदकनंतर 2011 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावलं होतं.
2
जागतिक कुस्ती स्पर्धेतला कांस्यपदक विजेता पैलवान राहुल आवारे आणि ऐश्वर्या पवार यांचा साखरपुडा पुण्यात संपन्न झाला.
3
ऐश्वर्या ही राहुलचे वस्ताद आणि भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार यांची कन्या आहे.
4
राहुल आवारेनं इतिहास घडवत नुकतेच जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला पैलवान ठरलाय.
5
2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं सोनेरी यश संपादन केलं होतं.
6
7
8
महाराष्ट्राची कुस्ती गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गवगव्यातच अडकली असतानाच राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत यश मिळवता येतं हे महाराष्ट्राच्या पैलवानांना दाखवून दिलं आहे.