✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नेहरु ते मोदी... अमेरिकन संसदेत कोणी आणि कधी केलं भाषण?

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jun 2016 11:58 PM (IST)
1

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 19 जुलै 2005 साली अमेरिकेच्या संसदेला संबोधित केलं आहे. मनमोहन सिंह यांनी दहशतवादाविरोधात अमेरिका आणि भारत या दोन देशांनी एकत्र येण्याचा संदेश दिला होता.

2

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी 18 मे 1994 रोजी अमेरिकन संसदेला संबोधित केलं होतं. भारत विश्व शांती आणि समृद्धीमध्ये आपलं योगदान देण्यासाठी तयार असून यासाठी भारत अमेरिकेसोबत आहे, असं नरसिंह राव यांनी सांगितलं होतं.

3

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 13 जून 1985 रोजी अमेरिकन संसदेला संबोधित केलं होतं. राजीव गांधी यांनी अमेरिकेच्या संसदेत दिलेल्या भाषणात स्वावलंबी भारताचं स्वप्न बोलून दाखवलं होतं. भारत एक युवा देश असून युवांमध्ये स्वावलंबी बनण्याची क्षमता असते, असा संदेश राजीव गांधी यांनी दिला होता. राजीव गांधी हे संसदेच्या संत्रांना संयुक्तपणे संबोधित करणारे पहिले पंतप्रधान होते.

4

यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी अमेरिकन संसदेत 13 ऑक्टोबर 1949 रोजी भाषण केलं होतं. नेहरु यांनी त्या भाषणामध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात संबंध सुधारण्याविषयी संदेश दिला होता. जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणातील विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी संसदेच्या दोन सत्रात भाषण केलं होतं. कारण त्यावेळी सभागृहाचं काम चालू होतं, त्यामुळं जागेच्या कमतरतेमुळे दोनदा भाषण करावं लागलं होतं.

5

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत जे भाषण केलं ते सर्व भारतीयांचा अभिमान वाढवणारं आहे. मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेत दहशतवादाविरोधात जगाने एकवटण्याचा महत्वाचा संदेश दिला. मोदी हे अमेरिकन काँग्रेसच्या बैठकीला संबोधित करणारे भारताचे सहावे पंतप्रधान ठरले आहेत. मात्र, मोदी यांच्या अगोदर भारताच्या पाच पंतप्रधानांनी अमेरिकन संसदेला संबोधित केलं आहे.

6

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 14 सप्टेंबर 2000 साली अमेरिकन संसदेला संबोधित केलं होतं. आशिया खंडाला समृद्ध, सहिष्णु आणि लाकशाहीवादी बनायचं असेल तर अगोदर समृद्ध भारत बनवणं गरजेचं आहे, असा संदेश वाजपेयी यांनी दिला होता. वाजपेयी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी भारत देश हा अनुबॉम्ब बनवणारा देश झाला होता. वाजपेयी यांनी आशिया खंडातील भारताची भूमिका मांडली होती.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नेहरु ते मोदी... अमेरिकन संसदेत कोणी आणि कधी केलं भाषण?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.