रोहित शर्माची मोठी झेप, रँकिंगमध्ये विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानी
रोहितच्या पुढे आता फक्त भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे वन डे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आता भारतीय फलंदाजांनी कब्जा केला आहे.
रोहितशिवाय फॉर्मात असलेल्या शिखर धवनलाही चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. धवनने आशिया चषकात पाच डावांमध्ये 342 धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या.
रोहित शर्मा फलंदाजांच्या वन डे रँकिंगमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयसीसीकडून जारी फलंदाजांच्या ताज्या वन डे रँकिंगमध्ये रोहितने मोठी झेप घेतली आहे.
आशिया चषकात भारतीय संघाचं यशस्वीपणे नेतृत्त्व केल्यानंतर रोहित शर्मासाठी आणखी एक खुशखबर आहे.
आशिया चषकात 10 विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवने कारकीर्दीत पहिल्यांदाच 700 गुण घेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
जसप्रीत बुमरा गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे.