धोनी कायम माझा कर्णधार राहिल : विराट कोहली
विराटने नेहमी युवा खेळाडूंचं नेतृत्व करत त्यांना प्रेरणा देणाऱ्या धोनीचे आभार मानले आहेत. एवढंच नव्हे तर धोनी आपला नेहमी कर्णधार राहिल, असंही विराट म्हणाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहेंद्र सिंह धोनी टीम इंडियाच्या वन डे आणि टी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर आता विराट कोहलीने आपली प्रितिक्रिया दिली आहे.
हा दिवस धोनीच्या यशस्वी कारकीर्दीचं सेलिब्रेशन करण्याचा आणि त्याच्या निर्णयाचा आदर करण्याचा आहे. धोनीला एक आक्रमक खेळाडू ते निर्णायक कर्णधार तयार होताना आपण पाहिलंय, अशी प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली.
कर्णधार म्हणून धोनीच्या कारकीर्दीचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत, अशा शब्दात भारताचा गोलंदाज इरफान पठाणने कौतुक केलं आहे.
धोनीने सर्व गोष्टींचा विचार करत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असं कॉमेंटेटर हर्षा भोगले म्हणाले.
बायोपिकमध्ये धोनीची भूमिका निभावणारा अभिनेता सुशांतसिंह राजपूतनेही धोनीच्या कारकीर्दीला सलाम केला.
धोनी आपल्या विचारांना वास्तवात बदलणारा कर्णधार आहे, ज्याने अनेकांना स्वप्न पाहायला शिकवलं आणि ते पूर्ण करायची प्रेरणा दिली, असं सुरैश रैना म्हणाला.
महेंद्रसिंह धोनीने वन डे आणि टी ट्वेंटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्याच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.
धोनी तू 9 वर्षे टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि संघाला नव्या उंचीवर नेलं, देशाला नक्कीच तुझ्यासारखा कर्णधार लाभल्याचा आनंद आहे, असं मोहम्मद कैफ म्हणाला.
धोनी तू एक यशस्वी कर्णधार असून टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेलंस. शिवाय अनेकांसाठी तू प्रेरणा आहेस, असं बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -