जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या यादीत भारत पहिल्या पाचमध्ये
‘दी स्पेक्टेटर इंडेक्स’ने जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी क्षमता असलेल्या देशांची ही यादी ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे. एकूण पंधरा देशांच्या नावांचा यात समावेश आहे. यात 12व्या स्थानी इटली तर 13व्या स्थानी ईराण या देशांचा समावेश आहे.
दी स्पेक्टेटर इंडेक्सच्या रिपोर्टनुसार ब्रिटन सहाव्या क्रमांकावर तर साऊथ कोरिया सातव्या स्थानावर आहे. जपान आठव्या क्रमांकावर असून जर्मनी दहाव्या स्थानावर आहे.
भारतीय सैन्याची ओळख त्यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे जगभर प्रसिद्ध आहे.
भारतीय नौसेना जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी जलसेना आहे. 1971 च्या पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात भारतीय नौसेनेची महत्वाची भूमिका राहीली आहे.
दी स्पेक्टेटर इंडेक्सच्या यादीनुसार फ्रांसची सेना पाचव्या क्रमांकावर आहे.
या यादीनुसार अमेरिकी सेनेला सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून ओळखले गेले आहे. तसेच जगातील सर्वात शक्तिशाली सेनेच्या यादीत रुसची सेना दुसऱ्या क्रमांकावर तर चीनची सेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘दी स्पेक्टेटर इंडेक्स’ने दिलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी क्षमता असलेल्या देशांच्या यादीत भारतीय सेना चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानला या यादीत टॉप-15मध्येही स्थान मिळालेले नाही.