भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास काय आहे?
भारत आणि पाकिस्तान संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर झालेली तुलना पाहता, टीम इंडियाचं पारडं जड भासतं. पाकिस्तानचा संघ हा बेभरवशाचा असला तरी तो कधीही धोकादायक ठरू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत-पाकिस्तानमधला अखेरचा सामना हा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दिनांक 19 मार्च 2016 रोजी खेळवण्यात आला होता.
भारत-पाकिस्तान संघांमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे उभय संघ तब्बल 15 महिन्यांनी आमनेसामने येत आहेत.
वन डेच्या विश्वचषकात भारतानं सहापैकी सहा सामन्यांत पाकिस्तानला लोळवलं आहे, तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं चारपैकी चार सामन्यांत पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या या भारत-पाकिस्तान लढाईच्या निमित्तानं विश्वचषकाचा इतिहास पाहायचा झाला, तर भारताचं पाकिस्तानवर 10-0 असं निर्विवाद वर्चस्व आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण सज्ज झालं आहे भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्यासाठी. एकमेकांचे सख्खे शेजारी, पण कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांसाठी विजेतेपदाच्या ट्रॉफीइतकाच एकमेकांविरुद्धचा विजयही तितकाच प्रतिष्ठेचा असतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -