Lockdown | घरातून बाहेर पडण्याआधी 'हे' फोटो नक्की पाहा
पोलीस प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडण्याचं कारण विचारत होते.
पोलिसांनी अनेक राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.
अनेक ठिकाणी पोलीस लोकांना घरी जाण्यास सांगत होते.
देशातील अनेक शहरांत बाईकवरून फिरणाऱ्या तरूणांना पोलिसांनी कठोर शिक्षा दिली.
कायद्याचं पालन न करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या काठीचा मार खावा लागला
अनेक ठिकाणी लोकांनी पोलिसांशी वादही घातला.
संचारबंदी असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या बाईकस्वारांना काठीने चांगली शिक्षा दिली.
अनेक ठिकाणी पोलिसांनी रस्त्यांवर फिरणाऱ्या तरूणांना भन्नाट शिक्षा दिली.
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांनी दोन मित्रांना एकमेकांचे कान पकडून उठाबशा काढायला लावल्या आहेत.
रस्त्यांवर फिरणाऱ्या काही तरूणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरचा वाढता कहर पाहता संपूर्ण देशात पुढिल 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेआधीच अनेक राज्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. तसेच अनेक ठिकाणी कर्फ्यूदेखील लावण्यात आला होता. तरीदेखील अनेक लोक घरातून बाहेर पडले होते आणि त्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पाहूयात फोटो...