खंडेरायाची सोन्याची जेजुरी भंडाऱ्याने न्हाऊन निघाली!
खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत कऱ्हा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने देवाच्या पालखीला स्नान घातलं जाईल. त्यानंतर रात्री ही पालखी पुन्हा गडावर पोहोचेल.
पालखी सोहळा नदी पात्रात पाचच्या सुमारास पोहोचल्यानंतर यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट, असा जयघोष खंडोबाच्या भाविकांनी केला.
अमावस्येला सुरुवात झाल्यानंतर हा सोहळा सुरु झाला. त्यांनतर दुपारी एक वाजता पालखीचे प्रस्थान गडावरुन कऱ्हा नदीकडे झालं.
सोमवती अमावस्येनिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे.
खंडेरायाची जेजुरी आज अशी पिवळीधमक झाली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. निमित्त होतं सोमवती अमावस्येचं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -