पोकेमॉन गो गेम विषयीच्या रंजक गोष्टी
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2016 03:47 PM (IST)
1
पोकेमॉनची सुरुवात 20 वर्षांपूर्वी 1995 मध्ये झाली होती. पोकेमॉनच्या अनेक टीव्ही सिरीअल, कॉमिक बुक आणि सिनेमा आले आहेत. हा गेमही त्याच सीरीजचा भाग असल्याचं बोललं जातं.
2
ही गेम खेळण्यासाठी लोक रस्त्याने फिरत आहेत. गेम खेळता खेळता एक महिला झाडामध्ये जाऊन अडकली. फायर ब्रिगेडने तिला वाचवलं.
3
पोकेमॉन एग्जला कॅच करण्यासाठी तुम्हाला एका ठराविक अंतरावर चालावं लागतं.
4
पोकेमॉन मिळवण्यासाठी तुम्हाला पोकेमॉन शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं.
5
या गेममध्ये तुम्ही फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करुन पोकेमॉन पकडून पॉईंट मिळवू शकता.
6
पोकेमॉन गो सध्या अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. भारतात हा गेम अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आला नाही.
7
पोकेमॉन गो या गेमने सध्या जगभरातील तरुणाईला वेड लावलं आहे. या गेमविषयी माहित नसणाऱ्या काही रंजक गोष्टी..