रणबीरसोबतच्या ब्रेकअपवर अखेर कतरिनाने मौन सोडलं!
कतरिना सध्या तिचा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी सिनेमा 'बार-बार देखो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
वैयक्तिक जिवन आणि भावना यांचा केवळ देखावा करणं नाही, तर एक चांगली मैत्रीण म्हणून कतरिनासाठी काही तरी करणं गरजेचं आहे, असं रणबीरचं मत आहे.
ब्रेकअपवर यापूर्वी रणबीरनेही स्पष्टीकरण दिलं होतं. कतरिनाची आपल्या जिवनात महत्वाची भूमिका आहे. मात्र रिलेशनशीप पेक्षा करिअर महत्वाचं आहे, असं रणबीरने सांगितलं होतं.
रणबीर आणि कतरिना दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या आगमी 'जग्गा जासूस' सिनेमात दिसणार आहेत.
'बार-बार देखो' सिनेमादरम्यानच रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात दुरावा आला. मात्र कतरिनाने मोठ्या संयमाने सिनेमाची शुटिंग पूर्ण केली.
ब्रेकअपचा मनावर परिणाम होतोच, पण एक अभिनेत्री म्हणून थोडा दिलासाही मिळतो, असं कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपची चर्चा हा सध्याचा सर्वात चर्चेचा विषय आहे. रणबीरने एका मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता कतरिनाने देखील मौन सोडलं आहे.