'2.0' सिनेमातील अक्षयचा लूक बॉलिवूडमध्ये लोकप्रिय
तर सिद्धर्थ मल्होत्रा म्हणतो की, ''भाऊ, तुमचा लूक कमालीचा आहे.''
चित्रपट निर्माता साजिद खाननेही अक्षयच्या लूकचे कौतुक केले आहे.
तर अभिनेता रितेश देशमुखने पहिला लूक कमालीचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या सिनेमातील अक्षय कुमारच्या फर्स्ट लूकचे बॉलिवूडमधून कौतुक होत असून बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, ''प्रत्येक वस्तूवर नजर, याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही,'' असं म्हटलं आहे.
अभिनेता मनिष पॉलनेही अक्षयच्या लूकचे कौतुक केलं आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही अक्षयच्या नव्या लूकचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.
350 कोटींचे बजेट असलेला हा सिनेमा 2010 मधील 'एंथिरन' या तामिळ सिनेमाचा सीक्वेल आहे.
अक्षयने या सिनेमात एका विक्षिप्त वैज्ञानिकाची भूमिका साकारली असून, सुपरस्टार रजनिकांत वसीगरन या वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या अपकमिंग 2.0 या सिनेमात अक्षय कुमार नव्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार खलनायकाची भूमिका साकरत असून, त्याच्या या सिनेमातील फर्स्ट लूकचे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांना कौतुक केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एस शंकर यांनी केलं आहे. तसेच या सिनेमात एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीपर्यंत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.