वनडेत सर्वात वेगवान 8000 धावा, विराटचा नवा विक्रम!

विराटनं 78 चेंडूत 96 धावा केल्या. याच शानदार खेळीत कर्णधार कोहलीनं एक मोठा विक्रमही रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशवर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये प्रवेश केला. भारतानं सेमीफायनलमध्ये 9 गडी राखून बांगलादेशला धूळ चारली. रविवारी 18 जूनला भारत आणि पाकिस्तान अशी ड्रिम फायनल होणार आहे. गोलंदाजाशिवाय या सामन्याचे खरे हिरो ठरले ते म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. फोटो सौजन्य : ICC (TWITTER)

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 8000 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम द. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज विराट एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर होता. डिव्हिलिअर्सनं 182 डावात 8000 धाव केल्या होत्या. तर विराटनं अवघ्या 175 डावांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला.
8000 धावा करण्यासाठी सौरव गांगुलीला 200 डाव खेळावे लागले होते. तर सचिननंही 210 डावांमध्ये हा आकडा गाठला होता. तर वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारानं 211 डावांमध्ये 8000 धावा केल्या होत्या.
दरम्यान, आजच्या सेमीफायनल सामन्यात, भारतानं 40.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 265 धावा केल्या. भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं 129 चेंडूत 123 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीनं 78 चेंडूत 96 धावांची तडाखेबंद खेळी साकारली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -