Union Budget 2019 : अर्थसंकल्पातील 12 महत्त्वाच्या घोषणा
भारतीय पासपोर्ट असणाऱ्या अनिवासी भारतीयांना आधारकार्ड दिले जाणार
हर घर जल योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सगळ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी, घरापर्यंत पाण्याचं कनेक्शन देणार
वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये असणाऱ्यांना कर द्यावा लागणार नाही, स्लॅबमध्ये बदल नाही, गुंतवणुकीवर मोठी सूट
400 कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांना 25 टक्के कर
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन, करामध्ये दीड लाखांची सूट
5 कोटींपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के अधिभार लावण्याचा प्रस्ताव
2 ते 5 कोटींपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अधिभार लावण्याचा प्रस्ताव
45 लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करणाऱ्याला 3.50 लाख रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त
वर्षभरात बँक खात्यातून 1 कोटींची रोख रक्कम काढल्यास 2 टक्के टीडीएस भरावा लागणार
आयकर रिटर्न भरण्यासाठी आता आधार कार्डही पुरेसं, पॅन कार्डची सक्ती नाही
सोने आणि मौल्यवान धातूंही महागले, उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरुन 12.5 टक्के
पेट्रोल आणि डिझेल महागणार, प्रत्येकी 1 रुपयाचा अतिरिक्त सेस