स्मार्टफोनमधून हे चार अॅप तातडीने डिलीट करा!

गृहमंत्रालयाने ज्या अप्सपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत, त्यात टॉप गन (गेम अॅप), एमपीजंक (म्यूजिक अॅप), व्हिडीजंक (व्हिडीओ अॅप) आणि टॉकिंग फ्रॉग (एंटरटेन्मेंट अॅप)चा समावेश आहे. गृह मंत्रालयानुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या अपमध्ये व्हायरस पाठवून गोपनीय माहिती मिळवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे चार अॅप असतील तर ते तातडीने डिलीट करा, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयानेच याबाबत अलर्ट जारी करुन, हे अॅप त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या अॅपद्वारे पाकिस्तानी यंत्रणा हेरगिरी करत असल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानी एजन्सी भारतात मोबाईल अॅपमध्ये मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करत आहे. गृह मंत्रालयाला या माहितीचा ठोस अहवाल मिळाल्यानंतर, देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांना पत्र लिहून काही ठराविक मोबाईल अॅप डाऊनलोड न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -