स्मार्टफोनपेक्षाही कमी किंमतीचा लॅपटॉप लाँच
दोन्हीही लॅपटॉपची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास साडे आठ तास चालते, असा कंपनीने दावा केला आहे. शिवाय ही बॅटरी 31 तासांचा स्टँडबाय टाईम देते तर 25 तासांचा म्युझिकल प्लेबॅक आणि साडे आठ तासांचा व्हिडीओ प्लेबॅकही देते. लॅपटॉपमध्ये असलेला टचपॅड मल्टी टच फंक्शनचं काम करतो.
विंडोज 10 सिस्टीमवर चालत असलेल्या या दोन्ही लॅपटॉपमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 0.3 मेगापिक्सेलचा VGA फ्रंट कॅमेरा आहे. ड्युअल स्पीकरसह यामध्ये वायफाय, ब्ल्यूटूथ, दोन USB पोर्ट आणि मिनी HDMI पोर्ट दिलं आहे. यामध्ये 10000 mAH क्षमतेची बॅटरी आहे.
कॉम्पबुक एग्जेमपियरचा डिस्प्ले 14 इंचचा आहे. ज्याचे रिझॉल्युशन 1366x768 पिक्सेल आहे. याचे वजन एक किलो 46 ग्रॅम आहे. दोन्हीही लॅपटॉपमध्ये 1.33 GHz क्वाड कोअर इंटेल प्रोसेसर आणि 2 GB ची DDR3 रॅम आहे. शिवाय दोन्ही लॅपटॉपमध्ये 32 GB चे इनबिल्ट स्टोअरेज आहे.
आयबॉल कॉम्पबुक एक्सलेंसची किंमत 9 हजार 999 रुपये आहे तर आयबॉल कॉम्पबुक एग्जेमपियरची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. या दोन्ही लॅपटॉपचे फिचर्स जवळपास एकसारखेच आहेत. या दोन्ही लॅपटॉपमध्ये केवळ स्क्रीन, डायमेंशन आणि वजनामध्ये फरक आहे. कॉम्पबुक एक्सलेंसची स्क्रीन 11.6 इंचची आहे ज्याचे रिझॉल्युशन 1366x768 पिक्सेल आहे. तर याचे वजन एक किलो नऊ ग्रॅम आहे.
स्मार्टफोन आणि टॅबलेट बनवणारी कंपनी आयबॉलने स्वस्त किंमतीचे दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. महत्वाचं म्हणजे स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने हे दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. आयबॉल कॉम्पबुक एक्सलेंस आणि आयबॉल कॉम्पबुक एग्जेमपियर असे या दोन विंडोज 10 लॅपटॉपचं नाव आहे. आयबॉलने लॅपटॉपसाठी मायक्रोसॉफ्ट आणि इंटेल कंपनीसोबत टायअप केलं आहे.