UPSC टॉपर टीना आणि सेकंड टॉपर अतहर लवकरच लग्नाच्या बेडीत!
काही लोकांनी टीनावर जातीयवादी टिप्पणीही केली. काहींनी धर्माबाबतही प्रश्न उपस्थित केले. मात्र प्रेम करणं गुन्हा नाही, असं टीना म्हणाली. मात्र काही जणांना टीनाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत स्वागत केलं.
पण आम्हाला कसलीही चिंता नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. मी आणि आमीर, पालक या निर्णयाने खुश आहोत. एक स्वतंत्र महिला म्हणून मला माझी आवड निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
टीना म्हणाली की, आमच्या संबंधाबाबत अनेक लोक चर्चा करत आहेत, ते ऐकून विचित्र वाटलं.
ऑगस्ट महिन्यात डीओपीटीमध्ये ट्रेनिंगच्या वेळी आमची भेट झाली. त्याच्यासाठी पहिल्याच नजरेत प्रेम झालं होतं, असं टीना दाबीने सांगितलं.
टीनाने अतहरसोबतचे तिचे काही फेसबुकवर पोस्ट केले आहेत. त्यानंतर तिने टीकेलाही निमंत्रण दिलं.
टीना दाबी ही दलित समाजातील असून अतहर काश्मीरी मुसलमान आहे. अतहर हा काश्मीरमधील छोट्या गावातून आलेला आहे. तर टीनाचं बालपण दिल्लीतच गेलं आहे.
अतहर फारच चांगला माणूस आहे. अतहरच्या चिकाटीसाठी त्याचे नेहमीच आभार मानते, असंही ती म्हणाली.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली येणारी टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर आमीर-उल-शफी खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली येणारी टीना दाबी आणि याच परीक्षेत दुसऱ्या स्थानावर आलेला अतहर आमीर-उल-शफी खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.