अखेर कृति सेननसोबतच्या अफेअरवर सुशांतने मौन सोडलं
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 10:56 AM (IST)
1
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अखेर कृति सेनन सोबतच्या कथित अफेअरवर आपलं मौन सोडलं आहे.
2
कृतिने देखील या अगोदर दोघांच्या अफेअरबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं.
3
मात्र चर्चा वाढतच असल्याचं पाहून सुशांतला यावर मौन सोडावं लागलं.
4
दोघांच्या अफेअरची चर्चा कधी तरी संपेल या आशेवर सुशांतने आतापर्यंत मौन बाळगलं होतं.
5
आपण सध्या कोणाच्याही प्रेमात नसल्याचं सुशांतने म्हटलं आहे.
6
'राबता' सिनेमाच्या शुटींग दरम्यान दोघे एकमेकांना डेट करत अससल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. बातम्या चांगल्या आहेत, पण काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात असं काहीही नाही, असं सुशांतने म्हटलं आहे.
7
कृति आणि सुशांत एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सगळीकडे होत आहेत.
8
'राबता' या सिनेमात दोघेही सोबत काम करत आहेत. अफेअरच्या चर्चेला सुशांतने पूर्ण विराम दिला आहे.