HTC 10 वर तब्बल 5 हजारांची सूट
फिंगरप्रिंट स्कॅनरसह HTC 10 मध्ये कनेक्टीव्हीटीसाठी ब्ल्यूटूथ 4.0, वायफाय 802.11, हे फीचर्स आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोनमध्ये 3000mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची क्वीक चार्जिंग असणारी बॅटरी 30 मिनिटात 50 टक्के चार्ज होते, जी 27 तासांचा बॅकअप देते.
HTC 10 या फोनमध्ये 12 अल्ट्रापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
भारतातील सध्याच्या ऑफर्सचा धमाका पाहता HTC नेही खास ऑफर आणली आहे. HTC 10 या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये तब्बल 5 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.
HTC 10 चं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच HTC 10 लाईफस्टाईल हे मॉडेलही लवकरच लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. संगीत प्रेमींसाठी या फोनमध्ये बूमसाऊंड डॉल्बी सराऊंडचा वापर करण्यात आला आहे. HTC 10 च्या कॅमेऱ्यात अल्ट्रापिक्सेल या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
HTC 10 ला 5.2 इंच आकाराची स्क्रीन, अल्युमिनियम बॉडी, क्वालकॉम स्नपड्रॅगन 820 2.2GHz प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 32 जीबी इंटर्नल स्टोरेज असे फीचर्स आहेत.
HTC 10 या वर्षात मे महिन्यात 52 हजार 990 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता. सध्या हा फोन 47 हजार 990 रुपयांत उपलब्ध आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -