'मोहेंजोदडो'चं जबरदस्त ट्रेलर, हृतिकचा कधीही न पाहिलेला अंदाज
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2016 11:40 PM (IST)
1
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या 'मोहेंजोदडो' सिनेमाचं ट्रेलर रिलिज करण्यात आलं आहे.
2
या सिनेमात हृतिक रोशन एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.
3
सिनेमाच्या ट्रेलरमधून हृतिक रोशनने केलेला अभिनय प्रेक्षकांना सरप्राईज असणार आहे. जोधा अकबर सिनेमानंतर हृतिकचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
4
हा सिनेमा 'मोहेंजोदडो' या शहराच्या कथेवर आधारित आहे.
5
सुपरहिट सिनेमे देणारे आशुतोष गोवारीकर या सिनेमातूनही आपली झलक दाखवतात का, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
6
हृतिक रोशन आणि पुजा हेगडे या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत.
7
'मोहेंजोदडो'मध्ये अॅक्शन रोमान्स आणि प्रेम कहणीचं तिहेरी मिश्रण पाहायला मिळणार आहे.
8
हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी रिलिज होत आहे.