हावडा-दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे 15 डबे घसरुन अपघात, भीषण अपघाताची दृश्यं
अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वे मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूर्वा एक्सप्रेसचा एसी कोच बी-3 ला अपघाताचा मोठा फटका बसला. या कोचमधील अधिक प्रमाणात प्रवासी जखमी झाले.
पूर्वा एक्सप्रेसची वेगमर्यादा प्रतितास 130 किलोमीटर असून अपघातावेळी ट्रेन 127 किमी प्रतितास वेगाने धावत होती.
मदतीसाठी एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
उत्तर प्रदेशमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे जवळपास वीस प्रवासी जखमी झाले आहेत. धावत्या ट्रेनचे 15 डबे घसरुन झालेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.
ट्रेनचे 15 डबे घसरले, तर चार डबे उलटले. अपघातानंतर अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला.
रात्री 1 वाजता ही घटना घडली. या अपघातामुळे अनेक एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.
कोलकात्याच्या हावड्यावरुन दिल्लीकडे येणारी पूर्वा एक्सप्रेसचे 15 डब्बे रुळावरुन उतरले. पण सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -