एका मेसेजवर जिओ फोन बुक करा!
आत्ता जिओ फोन बुक करणाऱ्या ग्राहकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात फोन मिळण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधार कार्डची फोटो कॉपी जवळच्या अधिकृत जिओ फोन विक्रेत्याला द्यावी लागेल. एका आधार कार्डवर केवळ एकच फोन खरेदी करता येईल.
जिओ फोन बुक करण्यासाठी ग्राहकाकडे आधार कार्ड असणं बंधनकारक आहे.
ज्या ग्राहकाला जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्याला कंपनीकडून अशा जिओ स्टोअरचा कोड दिला जाईल, जिथे जिओ फोन उपलब्ध असेल.
24 ऑगस्ट रोजी जिओ फोनची अधिकृत बुकिंग सुरु होणार आहे. तेव्हापासूनच ग्राहकांना फोन करुन त्यांच्या फोनविषयी माहिती दिली जाईल.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ग्राहकाचा हा मेसेज कंपनीला मिळताच फोनविषयी संपूर्ण माहिती कॉल करुन ग्राहकाला दिली जाईल.
मेसेज पाठवताच तुम्हाला Thank You असा रिप्लाय येईल.
जिओ फोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन ‘JP> तुमचा पिनकोड> जवळच्या जिओ स्टोअरचा कोड’ 7021170211 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
दुकानांमध्ये रांगते उभं रहायचं नसेल तर तुम्ही घरबसल्याही जिओ फोन बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल.
जिओ फोन खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक सध्या उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक दुकानांमध्ये या फोनची प्री बुकिंगही सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक फोनविषयी माहिती घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -