तुम्ही केबीसीमध्ये कसे जाऊ शकता? बिनीता जैन यांचा 'माझा'वर मंत्रा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही केबीसीमध्ये कसं जाऊ शकता? - कौन बनेगा करोडपतीमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर अनेक पायऱ्या तुम्हाला पार कराव्या लागतात. सोनी लिव्ह SONY LIV अॅप डाऊनलोड करुन, प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. या स्पर्धेबाबतची माहिती तिथे दिलेली आहे. तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर कोट्यवधी स्पर्धकांमधून सॉफ्टवेअरमार्फत 25 हजार स्पर्धकांची निवड होते. या 25 हजार स्पर्धकांना फोन करुन काही प्रश्न विचारतात. आधी वैयक्तिक प्रश्न असतात, मग 3 स्पर्धात्मक प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यास त्यांची निवड केली जाते. तुम्हाला दोनच कॉल केले जातात. नेटवर्क एरर, कॉल रिसिव्ह न केल्यास तुमची संधी हुकली. त्यामुळे 'नॉलेज आणि लक' हे दोन्ही आवश्यक आहे, असं बिनीता जैन यांनी सांगितलं.
लग्नाच्या दोन-तीन वर्षात मुलं झाली. पती व्यवसायानिमित्त शेजारील देशांमध्ये जात होते. मात्र लग्नाच्या 13 वर्षांनी त्यांचं अपहरण झालं ते आजपर्यंत घरी परतलेच नाहीत. पतीची आजही वाट पाहतेय. पती घरी न परतल्याने दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र अशा परिस्थितीत मी खचले असते तर कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. त्यामुळे मी कामात गुंतवणू घेण्याचं ठरवलं आणि शिकवण्या सुरु केल्या. त्याचवेळी माझं शिक्षणही सुरु झालं, असं बिनीता यांनी सांगितलं.
शिक्षण, बालपण, लग्न ते कौटुंबीक जबाबदारी - बिनीता जैन यांनी आता आता उच्च शिक्षण घेतलं आहे. त्यांचा जीवनप्रवास फिल्मी वाटावा असाच आहे. लहान वयातच म्हणजे बारावी झाल्यावर लगेचच त्यांचं लग्न झालं. महत्त्वाचं म्हणजे बिनीता जैन या बारावीमध्ये आसाममधील टॉपर होत्या. त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे. मात्र लग्नानंतर शिक्षण थांबलं.
...म्हणून 7 कोटीच्या प्रश्नाला क्विट केलं - लालच आणि अति हाव घातक ठरू शकते. त्यामुळेच मी 7 कोटीच्या प्रश्नाला थांबण्याचं ठरवलं. मी क्विट केल्यानंतर जे उत्तर दिलं ते सुद्धा बरोबर होतं. त्यामुळे मला अनेकांनी खेळायला हवं होतं वगैरे सल्ला दिला. मात्र मी जिथपर्यंत खेळले, ते योग्य होतं, असं बिनीता यांनी सांगितलं.
केबीसीमध्ये 1 कोटी जिंकल्यानंतर बिनीता जैन यांची मुलाखत घेणारं एबीपी माझा हे देशातील पहिलं चॅनल ठरलं. एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्यूजमध्ये बिनीता जैन यांनी ‘आसाम ते करोडपती’पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
‘डर के आगे जीत है’ - यावेळी बिनीता जैन म्हणाल्या ‘डर के आगे जीत है, मगर लालच बुरी चीज है’. तुमच्यावर दबाव असला तरी तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम असलं पाहिजे. भीतीवर मात केली तर विजय तुमचाच आहे. पण जिंकल्यानंतर लालच वाढू नये, अन्यथा घात होऊ शकतो, असा मंत्रा बिनीता जैन यांनी दिला.
‘डर के आगे जीत है, मगर ज्यादा लालच अच्छी बात नही’ असं म्हणत कौन बनेगा करोडपतीच्या दहाव्या सीझनमध्ये 1 कोटी जिंकलेल्या, बिनीता जैन यांनी आपला यशाचा पासवर्ड ‘एबीपी माझा’वर सांगितला.
मी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहे. मात्र भारतीय संविधानाचा खोलात जाऊन अभ्यास केला नव्हता. दोन आठवड्यापूर्वीच मी त्याबाबतचा अभ्यास केला. मी सर्व खटले नजरेखालून घातले. त्याचवेळी मी 13 न्यायाधीशांनी मिळून दिलेला निर्णय वाचला. त्यामुळेच ज्यावेळी मला प्रश्न आला, त्याचवेळी माझ्या डोक्यात उत्तर क्लिक झालं, असं बिनीता जैन म्हणाल्या.
‘1 कोटीच्या प्रश्नाला क्विट करणार होते’ - “मला जेव्हा 1 कोटीचा प्रश्न विचारला जाणार होता, तेव्हा माझ्या मनात आधीच आलं होतं, या प्रश्नाला आपण क्विट म्हणजेच थांबायचं ठरवलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कोणत्या खटल्याचा निकाल दिला होता हा प्रश्न आला आणि मी अचंबित झाले. कारण या प्रश्नाचं उत्तर माहित होतं. मात्र एक कोटीच्या रकमेच्या प्रश्नाला उत्तर देताना थोडी भीती होतीच. त्यामुळे उत्तर येऊन मी घाबरले होते. थोडं थांबून मी पर्याय सांगितला डी- केशवानंद भारती केस.
या उत्तरानंतर सर्वत्र शांतता पसरली आणि फक्त आवाज घुमला महानायक अमिताभ बच्चन यांचा... एक करोडडडडड रुपय......” असं बिनीता जैन यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -