अवघ्या 240 रुपयात मिळणार रहिवासी पुरावा ओळखपत्र!
व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत तुमच्याकडे कलर अॅड्रेस आयडी प्रूफ येईल. यापेक्षा कमी कालावधीही लागू शकतो. कारण की. तुम्हाला हा रहिवासी पुरावा मिळाल्यानंतर तुम्ही चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड यासाठी अर्ज करु शकतात. तुमचे हे रहिवासी पुरावा कार्ड फक्त 3 वर्षासाठी वैध असणार आहे. त्याची वैधता संपल्यानंतर तुम्ही 150 रु. देऊन ते पुन्हा रिन्यू करु शकता. याबाबत पोस्ट ऑफिसमधून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतात.
फॉर्ममध्ये भरलेली माहिती व्यवस्थित भरा कारण की, त्या माहितीची चाचपणी होणार आहे. पोस्ट ऑफिसकडून एखाद्या पोस्टमनकडून तुमचं अॅड्रेस व्हेरिफिकेशन होईल. त्याच्या रिपोर्टनंतरच तुम्हाला तिथला रहिवासी पुरावा मिळेल.
या फॉर्ममध्ये तुमच्या रहिवासी पुरव्यासंबंधी सगळी माहिती भरणं आवश्यक आहे. या फॉर्मसोबत तुम्हाला 240 रु. भरावे लागणार आहेत. तसेच दोन कलर फोटोही द्यावे लागणार आहेत.
यानंतर पोस्ट ऑफिस अधिकाऱ्याला जाऊन भेटा, त्यांना भेटल्यानंतर रहिवासी आयडी प्रूफ साठी फॉर्म घ्यावा लागेल. त्यानंतर फॉर्म शुल्क 10 रु. भरावं लागेल. तसंच हा फॉर्म इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. पोस्टाच्या वेबसाइटवर जाऊन हा फॉर्म डाऊनलोड करु शकता.
तुमचा लोकल रहिवासी पुरावा तयार करण्यासाठी पोस्ट ऑफिसमधून तुमच्या घरी एक पत्र स्वत:च्या नावे पाठवायचं आहे. हे पत्र रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टानं पाठवणं गरजेचं आहे. साधारण पोस्ट पाठवू नये. जेव्हा तुमच्या घरी ते पत्र येईल त्यावेळी ते पत्र घेऊन पुन्हा एकदा तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल.
भारतीय पोस्ट विभागानं रहिवासी पुरावा नावानं एक नवी सेवा सुरु केली आहे. ज्याचा फायदा विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला होणार आहे. यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रहिवासी पुराव्यासाठी अर्ज करु शकता.
कोणतेही शासकीय मान्यता असलेले कागदपत्र हवे असल्यास त्यासाठी रहिवासी पुरावा (अॅड्रेस प्रूफ) हवाच असतो. अनेकदा आपल्याकडे रहिवासी पुरावा नसतो. त्यामुळे तुमची बरीच अडचण होते. पण आता अगदी सोप्या रितीनं तुम्ही आपला रहिवासी पुरावा बनवू शकतात. पाहा कसं बनवता येईल तुमचा रहिवासी दाखला. भारतीय पोस्ट विभागानं रहिवासी पुरावा नावानं एक नवी सेवा सुरु केली आहे. ज्याचा फायदा विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला होणार आहे. यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रहिवासी पुराव्यासाठी अर्ज करु शकता.