...तर तुम्ही प्रेमात पडला आहात!
तुम्ही स्वत: ला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजत असता. जर तुम्ही झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर त्याचाच विचार करत असाल, तर तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात.
पुर्वी तुम्हाला एखादे काम सांगितले तर तुम्ही ते टाळता. किंवा एखादी अॅडजेस्टमेंट करायला सांगितली, तर तुम्ही त्याला स्पष्ट नकार देता.पण तुम्ही जेव्हा प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही कोणतीही अॅडजेस्टमेंट करण्यास तयार होता. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडत असते.
अनेकादा तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटता. तेव्हा त्याचा सहवास तुम्हाला हवाहवासा वाटतो. पण तुमच्या मनात ही भावना का येत असते याचे उत्तर अनेकांना मिळत नाही.
तुम्ही प्रेमात पडल्यानंतर फ्यूचर प्लॅनिंग करण्याकडे तुमचा जास्त कल असतो. उदा. लग्न, घर, सेव्हिंग इत्यादीचा विचार करू लागता.
जर तुम्हाला या भावनांन पाठीमागे काय आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर आधी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे असते.
पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरणे, त्यांच्यासोबत फिल्म पाहायला जाणे या साऱ्या गोष्टी आवडीच्या असतात. पण काही काळानंतर तुम्हाला त्या बोअरिंग वाटायला लागतात
कारण तुम्हाला तुमच्या स्पेशल वनचा फोन तुम्हाला महत्त्वाचा वाटत असतो. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही प्रेमात पडला आहात.
जेव्हा तुम्हाला एकाच व्यक्तीची सतत आठवण येत असेल. प्रत्येक ठिकाणी त्याची उणिव भासत असेल, तेव्हा तुम्ही सतत चूका करत राहता. आणि विशेष म्हणजे त्यावेळी तुम्हाला ही फिलिंग खूपच आवडत असते.