झटपट मिळवा तुमचं मतदान कार्ड....
अर्ज केल्यानंतर एका महिन्याच्या आत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात येऊन तुम्ही तुमचं मतदान कार्ड घेऊन जाऊ शकता.
तुम्ही ऑनलाइन अर्जही करु शकता. किंवा जवळच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊनही अर्ज करु शकता.
हे सर्व कागदपत्र तुम्ही फॉर्म नंबर 6 सोबत जोडायचे आहेत.
जर तुमच्याकडे जन्म तारखेचा पुरावा नसेल तर मतदान यादी समावेश असलेल्या तुमच्या आई-वडिलांच्या हस्ताक्षरात वयाची माहिती लिहून देऊ शकतात. यासाठी फक्त तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे.
तर जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला जोडता येईल.
मतदान कार्ड बनविण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, पाणी बिल, वीज बिल, टेलिफोन बिल देता येईल.
मतदान कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यावी लागणार नाही.
बँक खातं सुरु करण्यासाठी, फोन कनेक्शनसाठी आणि इतर सरकारी कामांसाठी हे मतदान कार्ड पुरावा म्हणून सादर करता येतं.
18 वर्ष आणि त्याहून अधिक कोणताही भारतीय नागरिक मतदान कार्ड बनवू शकतो.
भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकाला काही अधिकार दिले आहेत. या अधिकारातील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा. याचसोबत दिलं जाणारं वोटर आयडी (मतदान कार्ड) हे देखील एक महत्वाचं शासकीय कागदपत्र आहे. जाणून घ्या कसं मिळवाल तुमचं व्होटर आयडी.