जवळपास साडे 11 लाख पॅन कार्ड रद्द, तुमचं स्टेटस काय?
आयकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर गेल्यानंतर know your PAN या पर्यायावर क्लिक करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओटीपी टाकून पुढे गेल्यानंतर तुमच्या पॅन कार्डचं सध्याचं स्टेटस दाखवलं जाईल. पॅन कार्ड चालू असेल, तर Active असं दाखवलं जाईल.
know your PAN या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डची माहिती भरावी लागेल. पॅन कार्डशी नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओटीपी दिला जाईल.
अर्थ मंत्रालयाने तब्बल 11 लाख 44 हजार पॅन कार्ड रद्द केले आहेत. पॅन हे प्रत्येकाचं आर्थिक ओळखपत्र आहे. बँकेसह अनेक आर्थिक व्यवहार पॅनशिवाय होत नाहीत. मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर दोन पॅन कार्ड असल्याचं आढळून आल्यानंतर अर्थ मंत्रालयाने पॅन रद्द केले आहेत.
अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2017 पर्यंत एकच व्यक्ती किंवा संस्थेकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळून आल्याने एकूण 11 लाख 44 हजार 211 पॅन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. पुढे पाहा, तुमचं पॅन कार्ड चालू आहे की बंद...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -