घरातील 'या' गोष्टींमुळे हृदय विकाराची शक्यता
सर्क्युलेशन नावाच्या मासिकामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. सर्वप्रथम साल 2004 ते 2008 दरम्यान केरोसिन, डिझेल आणि गॅसमुळे होणाऱ्या प्रदुषणाचं निरीक्षण करण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या घरात इंधनमुक्त वातावरण आहे, अशा घरात हृदय रोगामुळे मृत्यूचा धोका 6 टक्क्यांनी कमी होतो.
हृदय रोगामुळे मृत्यूचा धोका 11 टक्के आहे, तर रक्तस्त्रावामुळे मृत्यूचा धोका 14 टक्के आहे.
डिझेल किंवा केरोसिनच्या वासामध्ये ज्यांचा जास्त सहवास असतो, अशांचा मृत्यू विविध रोगांमुळ होण्याचं प्रमाण 6 टक्के आहे, असं या संशोधनात म्हटलं आहे.
घरात केरोसिन किंवा डिझेल जास्त वेळ राहिल्यास, किंवा वापर झाल्यास हृदय विकाराचा झटका येतो, ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो, असं अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधक सुमित मित्तर यांनी सांगितलं.
जगातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीमध्ये जगत आहे. जी वीजेच्या अभावामुळे उजेडासाठी, स्वयंपाक करण्यासाठी केरोसिनचा वापर करते. त्यामुळं घरात प्रदुषण वाढतं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WFO ने सांगितलं आहे.
केरोसिनचा वापर किंवा स्वयंपाक बनवतानाचा धूर घरात जास्त वेळ राहिल्यास हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते, असं एका संशोधनात समोर आलं आहे.
मानसिक त्रास किंवा इतर शारिरीक अस्वास्थ्य हे हृदय विकाराचा झटका येण्यामागचं कारण आहे, असं आजपर्यंत माहित होतं. मात्र हृदय विकाराचं खरं कारण घरातच लपलं असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -