बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल्ल 3' चा गल्ला फुल्ल !

अभिनेता अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे.
यापूर्वी 2010 मध्ये हाऊसफुल हा सिनेमा आला, तर त्यानंतर 2012 मध्ये 'हाऊसफुल 2' आणि आता 'हाऊसफुल 3' हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
'हाऊसफुल 3' ने पहिल्याच दिवशी 15.21 कोटी, दुसऱ्या दिवशी 16.30 कोटी, तिसऱ्या दिवशी 21.80 कोटी तर चौथ्या दिवशी 8.25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे कमाईचा आकडा 61.56 कोटींवर पोहोचला आहे.
'फॅन'पाठोपाठ अक्षय कुमारचा एयरलिफ्ट या सिनेमाने 44.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या बागी या सिनेमाने तीन दिवसात 38 कोटींची कमाई केली होती.
यापूर्वी यंदा 'फॅन'ने विकेंडमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता 'हाऊसफुल 3'ने त्यापुढे मजल मारली आहे.
सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 53 कोटींची कमाई केली असून, चार दिवसातील कमाईचा आकडा 61 कोटींच्या घरात पोहोचला आहे. 'हाऊसफुल 3' ने विकेंड कमाईत शाहरुखच्या 'फॅन' सिनेमाचा विक्रमही मोडला आहे.
अभिनेता अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे.