चीनने बनवला जगातील सर्वात लांब सागरी पूल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सागरी पुलामध्ये पाण्याखालून जाणाऱ्या बोगद्यांचाही समावेश आहे. वाढतं बजेट, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कामगारांचे मृत्यू यामुळे पुलाचं बांधकाम होण्यास नऊ वर्षांचा कालावधी लागल्याचं म्हटलं जातं.
हाँगकाँग आणि मकाऊ या दोन शहरांमध्ये मिळून 6 कोटी 80 लाख नागरिक राहतात. या पुलामुळे दोन शहरांमधील अंतर तीन तासांवरुन अवघ्या 30 मिनिटांवर आलं आहे.
पुलाचं बांधकाम डिसेंबर 2009 मध्ये सुरु झालं होतं. 20 बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे एक लाख 47 हजार कोटी रुपये खर्च करुन हा पूल उभारण्यात आला आहे.
मकाऊ आणि हाँगकाँग या शहरांना जोडणारा जगातील सर्वात लांब 55 किलोमीटरचा सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा जगातील सर्वात लांब सागरी पूल आहे.
चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांनी या सागरी पुलाचं उद्घाटन केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -