बाइकसाठी अवघ्या एका तासात झटपट कर्ज!
या योजनेमुळे होंडाच्या बाइकच्या खरेदीत बरीच वाढ होऊ शकते. त्यामुळे कंपनीने इंडसइंड बँकेसोबत करार केला आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी बँकेची कोणतीही प्रोसेसिंग फी नसून त्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही.
होंडाच्या बाइकसाठी तुम्हाला जवळजवळ 90 टक्के कर्ज इंडसइंड बँकेकडून मिळेल. हे कर्ज तुम्हाला 36 महिन्यात फेडायचं आहे. दरमहिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत जमा करावी लागणार आहे.
इंडसइंड बँकेने आपल्या सर्व शाखांवर या कर्जाची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची होंडाची बाइक खरेदी करु शकतात.
होय! होंडा मोटर्सनं इंडसइंड बँकेसोबत मिळून एक करार केला आहे. ज्यामध्ये ग्राहकाला अवघ्या एका तासात बाइकसाठी कर्ज मिळेल. पण त्यासाठी होंडाचीच बाइक खरेदी करणं गरजेचं आहे.
आजच्या तरुणांना बाइक फिरवणं तसं भलतंच आवडतं. कमाई सुरु झालेली नसतानाही त्यांना वयाच्या 18व्या वर्षीच नवी बाइक खरेदी करायची असते. पण अनेकदा पैसे नसल्यानं गाडी हे फक्त स्वप्नच राहतं. पण आता काळजी करु नका, तुमचा हा प्रश्न लवकरच सुटू शकेल. कारण की, बाइकसाठी होंडा कंपनी कर्ज देणार आहे. त्यासाठी एक विशेष स्कीम आणली आहे. ज्यामध्ये अवघ्या 1 तासात बाइकसाठी कर्ज मिळेल.