मासिक पाळीतील अतिरक्तस्त्राव कमी करण्यासाठी घरगुती टिप्स
मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव व्यवस्थित होत नसेल तर अर्धा चमचा हिंग एक कप पाण्यात घालून दिवसातून दोन वेळा घ्यावा.
कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तस्त्राव साफ होतो आणि वेदनाही कमी होतात.
आल्याचा तुकडा कपभर पाण्यात घालून उकळून त्यात साखर घालून प्यायल्याने रक्तस्त्राव व्यवस्थित होऊन वेदना कमी होतात.
एक चमचा काळे तीळ, अर्धा चमचा ओवा चार कप पाण्यात घालून ते पाणी आटवावं. त्यात थोडा गूळ घालून दिवसातून दोन वेळा प्यावं. यामुळे पाळीदरम्यान येणाऱ्या कळा कमी होतात. तसंच कंबरदुखी, स्त्रावाचा रंग बदलणं यावर तीळ उत्तम उपाय आहे.
जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या महिलांनी तुळशीच्या रसामध्ये मध घालून हे मिश्रण दोन ते तीन वेळा घ्यावं.यामुळे जास्त रक्तस्त्राव थांबेल, त्यासोबत अशक्तपणाही कमी होईल.
पिकलेलं केळं, साखर आणि तूप खाल्ल्यानेही अतिरक्तस्त्राव कमी होतो.
मासिक पाळीच्या नियमिततेसाठी ओमेगा थ्री फॅटी अॅसिडचा आहारात समावेश करावा. उदा. अक्रोड, पेरु, बाजरी, सोयाबिन, चीज, दूध, संत्र, अंडी, चिकन, मासे
मासिक पाळी नियमित येण्यासाठी पौष्टिक आहार, भरपूर पाणी, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.