✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय!

एबीपी माझा वेब टीम   |  02 Dec 2016 11:02 AM (IST)
1

अॅलोवेरा जेल - अॅलोवेरा जेल लावल्यास केस गळती थांबू शकते. अॅलोवेरा जेल थेट स्काल्पवर लावा. काही तास ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवा. एका आठवड्यात तीन ते चार वेळा ही प्रक्रिया करा.

2

अॅलोवेरा जेल आणि कांद्याचा रस - 3 चमचा कांद्याच्या रसात 2 चमचे अॅलोवेरा जेल मिक्स करा. यात तुम्ही 1 चमचा ऑलिव्ह ऑईल पण मिसळू शकता. हे मिश्रण केसांवर लावून 30 मिनिट ठेवा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका.

3

कांद्याचा रस - कांद्याच्या रसामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. कांद्याचा रस स्काल्पवर लावा. 30 मिनिटं तसंच ठेवून पाण्याने केस धुवून टाका.

4

मेथी - केस गळतीच्या उपचारांसाठी मेथीही अतिशय चांगली असती. एक कप मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी भिजलेली मेथी वाटून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि शॉवर कॅप लावा. 40 मिनिटांनी केस धुवून टाका. महिन्यातून एकदा हा उपाय करा, तुम्हाला परिणाम दिसेल.

5

आवळा - नैसर्गिक आणि लवकर केस वाढण्यासाठी आवळ्याचा वापर करा. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे केसगळतीच्या अडचणी दूर होतात. अँटीऑक्सिरडंट आणि अँटीबॅक्टेरियल असलेल्या आवळ्याच्या एक चमचा रसमध्ये लिंबूरस मिसळा. या मिश्रणाने टाळूवर चांगला मसाज करा. रात्रभर हे मिश्रण तसंच राहू द्या आणि सकाळी शॅम्पूने धुवून टाका.

6

हेअर ऑईल आणि इसेंशिअल ऑईल - खोबरेल तेल, बदाम तेल, आवळा तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा कॅस्टर आईल तुम्ही केसांना लावू शकता. याशिवाय रोजमेरी इसेंशिअल ऑईलचे काही थेंब बेस ऑईलमध्ये मिक्स करुन लावल्याण परिणाम जाणवेल. आठवड्यातून किमान एक वेळा हेअर ऑईलने मसाज करा.

7

हेअर ऑईल मसाज - जर तुमचे केस गळत असतील, तर स्काल्पवर (टाळू) मसाज करणं गरजेचं आहे. केसांच्या तेलाने व्यवस्थित मसाज करा. यामध्ये रक्ताभिसरण वाढतं आणि केसांची मूळं मजबूत होतात. यामुळे तणावही कमी होतो.

8

बहुतांश महिला आणि पुरुषच केसगळतीमुळे त्रस्त आहे. केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. पण काळजी करण्याची गरज नाही. केस कोणत्याही कारणांमुळे गळत असतील, पण काही घरगुती उपायांमुळे तुम्ही त्यावर मात करु शकता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.