यंदाच्या होळीत 'प्रियांका वॉटर टँक'ची धूम
देशभरात नरेंद्र मोदी, योगी आदित्यानाथ, मायावती यांच्या नावाच्यासुद्धा पिचकारी बाजारात पाहायला मिळत आहे.
मागील निवडणुकीत मोदी पिचकारी चांगलीच लोकप्रिय ठरली होती. यंदा मात्र प्रियंका पिचकारीची धूम पाहायला मिळतेय. तर प्रियांका वॉटर टँकलाही नागरिकांची चांगलीच मागणी पाहायला मिळतेय.
मात्र यंदा प्रियांकाच वरचढ ठरत आहे. 'प्रियंका वॉटर टँक'ची किंमत 250 रुपये आहे.
नाशिकच्या स्थानिक बाजारात प्रियांका गांधीच्या पिचकारीला मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या रंगाची उधळण तर होईलच पण त्यापूर्वी काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीसाठी बाजार सज्ज झाले आहे. मात्र यंदाच्या होळीच्या बाजारावर निवडणुकीच्या रंगाचा परिणाम पाहायला मिळतोय. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत 'प्रियांका वॉटर टँक' नावाची पिचकारी दाखल झाली आहे.