एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
विराट कोहली : या यादीत विराट आठव्या स्थानावर आहे. विराटने एशिया कपमध्ये 61.30च्या सरासरीने 613 केल्या आहेत. विराटने एशिया कपमध्ये 3 शतकं ठोकली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनथ जयसूर्या : श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याने एशिया कपमध्ये 25 सामन्यात सर्वाधिक 1120 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकर : एशिया कपमध्ये यशस्वी फलंदाजामध्ये सचिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने एशिया कपमध्ये 51.10च्या सरासरीने 971 धावा केल्या आहेत. एशिया कपमध्ये सचिनने 2 शतकं ठोकली आहेत.
अर्जुना रणतुंगा : एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रणतुंगा चौथ्या स्थानावर आहे. रणतुंगाने 57च्या सरासरीने 741 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.
कुमार संगकारा : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या क्रमाकांवर आहे. संगकाराने 48.86च्या सरासरीने 1075 धावा केल्या आहेत. ज्यात 4 शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे.
एशिया कपचा इतिहास पाहता आतापर्यंत श्रीलंकेच्या खेळाडूंचा यामध्ये दबदबा राहिला आहे. एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या टॉप-8 खेळाडूंमध्ये श्रीलंकेचे सहा फलंदाज आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -